कंबर दुखी ही समस्या कोणत्याही वयामधील व्यक्तींना होऊ शकते. कंबर दुखी होण्यामागे चुकीची जीवनशैली, वय किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. कंबर दुखी ही फक्त शारीरिक कामामुळेच होते असे नाही तर चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे, वजन उचलणे या गोष्टीमुळे सुद्धा होऊ शकते. आजच्या ब्लॉगमध्ये आपण कंबर दुखीची लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

कंबरदुखीची लक्षणे : 

कंबर दुखीची लक्षणे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात आणि प्रत्येक व्यक्तीला ती वेगळ्या प्रकारे अनुभवायला मिळू शकतात. कंबरदुखीची काही सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहे : 

– कंबरेच्या खालच्या भागांमध्ये तीव्र प्रमाणामध्ये वेदना जाणवणे.

– कंबरेमध्ये होणाऱ्या वेदना वेगवेगळ्या भागात जसे की मांडी, पाय आणि बोटांपर्यंत जाऊन पोहोचणे. 

– कंबर दुखी असल्यास पायामध्ये जड पण जाणवू शकते तसेच तीव्र प्रमाणामध्ये वेदना सुद्धा जाणवू शकतात.

– थोड्याफार हालचाली करत असताना सुद्धा स्नायूंमध्ये ताण जाणवतो हे सुद्धा कंबर दुखीचे लक्षण असू शकते.

– स्नायूंवर ताण आल्यामुळे चालायला अडचणी निर्माण होतात.

– काही लोकांमध्ये कंबर दुखी असल्यास शरीराच्या इतर भागांना सुद्धा थकवा जाणवू शकतो.

– वेदना होत असलेल्या प्रभावित भागांमध्ये सूज येऊ शकते. 

– शारीरिक हालचाली करत असताना तीक्ष्ण आणि खेचणारी संवेदना जाणवणे. 

– मांडीच्या भागांमध्ये अस्वस्थता जाणवणे आणि सतत दुखणे. 

– व्यक्तींना काही वेळा मांडीच्या भागांमध्ये तीव्र वेदना सुद्धा जाणवू शकतात. 

कंबरदुखीची कारणे : 

कंबर दुखी होण्यामागे व्यक्तीनुसार वेगवेगळी कारणे असू शकतात, परंतु कंबर दुखी होण्यामागे काही कारणे पुढील प्रमाणे आहेत :

– खूप वेळ एका ठिकाणी बसणे, अत्याधिक वेळ एकाच ठिकाणी उभे राहणे किंवा जास्त वेळ अस्वस्थ स्थितीमध्ये असणे यामुळे स्नायूंना ताण निर्माण होऊन कंबर दुखी होऊ शकते. 

– चुकीच्या पद्धतीने बसणे, चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने खाली वाकणे यामुळे सुद्धा पाठीच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि कंबर दुखीची समस्या जाणवू शकते.

– जास्त वजन असेल तर त्याचा पाठीवर अतिरिक्त ताण पडू शकतो आणि या कारणामुळे सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

– वय वाढल्यामुळे सुद्धा पाठीच्या मनक्यामधील डिस्कचे प्रॉब्लेम तसेच मणक्याचे इतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि परिणामी कंबरदुखी ही समस्या जाणवू शकते.

– पाठीचे विकार जसे की स्लिप डिस्क होणे, मणक्यामध्ये गॅप पडणे किंवा इतर पाठीच्या विकारांमुळे कंबर दुखी होऊ शकते.

– काही केसेसमध्ये अतिरिक्त मानसिक ताण, चिंता तसेच दबाव यामुळे सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

– कर्करोग, गाठी निर्माण होणे किंवा इन्फेक्शन होणे यांसारख्या विकारांमुळे सुद्धा पाठीवर परिणाम होऊन कंबरदुखी होऊ शकते. 

– चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यामुळे किंवा जास्त व्यायाम केल्यामुळे सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

– खेळ चुकीच्या पद्धतीने खेळल्यामुळे किंवा जास्त वेळ खेळल्यामुळे सुद्धा कंबर दुखीची समस्या जाणवू शकते. 

– हीप जॉईंट समस्या असतील तर अशावेळी सुद्धा कंबर दुखी जाणवू शकते.

– जर यूरोलॉजिकल समस्या जसे की मूत्रमार्गामध्ये संसर्ग म्हणजेच युटीआय, मुतखडे, पुरुषांमध्ये प्रोस्टाटायटिस यामुळे सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

– स्त्रियांमध्ये ओटी पोटीच्या समस्या , एंडोमेट्रोइसिस यांसारख्या समस्यांमुळे सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

– पाठीच्या हाडांमध्ये काही फ्रॅक्चर असल्यास कंबर दुखीची समस्या जाणवू शकते.

कंबर दुखीवर उपचार :

– कंबर दुखीची समस्या असल्यास त्यासाठी आराम करणे खूप महत्त्वाचे आहे.

– कंबर दुखी मुळे सूज येत असेल तर त्यावर बर्फाने शेक देऊ शकतो तसेच सूज कमी झाल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेक देऊ शकतो जेणेकरून पाठीला आराम मिळेल. 

– डॉक्टरांच्या सल्ल्याने पाठीसाठी योग किंवा व्यायाम करू शकता, यामुळे सुद्धा कंबर दुखी मुळे होणाऱ्या वेदना कमी होऊ शकतात.

– पाठीच्या स्नायूंना डॉक्टरांच्या सल्ल्याने हलके मसाज किंवा तेल मालिश दिल्यामुळे सुद्धा कंबर दुखी कमी होऊ शकते. 

– कंबर दुखीसाठी नक्कीच डॉक्टरांकडे जावे, डॉक्टर योग्य ते औषधोपचार करतील तसेच कंबर दुखीच्या एकंदरीत प्रकारावरून फिजिओथेरपी किंवा जास्त गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांमार्फत सर्जरीची निवड केली जाते. 

– हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम तसेच विटामिन डी असलेला आहार सेवन करणे आवश्यक आहे, एकंदरीतच चांगल्या आहाराचा समावेश आपल्या जीवनशैलीमध्ये असावा. 

कंबरदुखी टाळण्यासाठी काही टिप्स –

– कंबर दुखी होऊ नये यासाठी लॅपटॉप, स्मार्टफोन हाताळताना योग्य स्थितीमध्ये बसावे. 

– कंबर दुखीची समस्या टाळण्यासाठी तसेच इतरही अनेक समस्या टाळण्यासाठी आपले वजन नियंत्रणामध्ये ठेवावे. 

– दररोज योग तसेच व्यायाम करावा. 

– वस्तू उचलत असताना किंवा खाली वाकताना योग्य प्रकारे वाकावे, जर चुकीच्या पद्धतीने आपली हालचाल झाली तरी सुद्धा कंबर दुखी होऊ शकते. 

–  शरीरासाठी किमान सात ते आठ तास झोप आवश्यक असते, त्यामुळे शरीराला आवश्यक तो आराम नक्की द्यावा. कंबर दुखी होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात परंतु जर कंबर दुखी होऊ नये यासाठी वर सांगितल्याप्रमाणे काही टिप्स फॉलो केल्या तसेच योग्य ती काळजी घेतली तर कंबर दुखी ही समस्या होण्यापासून वाचू शकतो परंतु काही कारणास्तव कंबर दुखी झाल्यास त्यावर वेळीच उपचार करणे सुद्धा आवश्यक आहे, म्हणून कंबर दुखी दीर्घकाळ असल्यास किंवा तीव्र असल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे. तुम्हीही कंबरदुखीच्या त्रासाने त्रस्त झाला असाल तर आजच द प्रोलोथेरपी क्लिनिक येथे भेट द्या.