खांदा हा आपल्या शरीरामधील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कारण यामुळेच आपले हात विविध कार्य करू शकतात परंतु खांद्याला दुखापत झाली तर अशावेळी हातांची हालचाल करणे अवघड होऊन जाते. खांद्यामध्ये दुखापतीचा त्रास हा विविध प्रकारे जाणवू शकतो जसे की खांदा दुखणे, खांद्याला जखम होणे, खांद्याला सूज येणे यामुळे हातांचे कार्य विस्कळीत होऊ शकते. आजच्या आपण खांद्याच्या दुखापतीचे निराकरण कसे करावे याबद्दल माहिती बघणार आहोत.
खांद्यामध्ये होणाऱ्या दुखापतीची कारणे
– जर समजा खांद्यामधील एखाद्या हाडाला इजा झाली किंवा एखाद्या हाड तुटले तर अशावेळी खांदा दुखू शकतो. खांद्याला कुठलेही फ्रॅक्चर झाले तर खांद्याला वेदना होतात.
– ज्यावेळी खांद्यामधील स्नायू तसेच हाडांना सूज येते त्यावेळी खांद्यांना वेदना होते.
– खांद्याच्या स्नायूंचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग केल्यामुळे सुद्धा दुखापत होऊ शकते.
– खांद्याच्या सांध्यातून हाड बाहेर पडणे म्हणजेच डीसलोकेशन होणे हे सुद्धा खांद्याच्या दुखापतीचे एक महत्त्वाचे कारण आहे.
– ऑस्टिओऑर्थोराइटिस , खांद्याच्या सांध्यामध्ये घर्षण होऊन हाडे घासले जाऊ शकतात यामुळे सुद्धा खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात.
– अति जड वस्तू उचलणे किंवा जास्त कष्टाचे काम केल्यामुळे सुद्धा खांदे दुखू शकतात.
खांद्याच्या दुखापतीचे लक्षणे
खांद्याच्या दुखापतीचे लक्षणे विविध आहेत, त्यापैकी काही लक्षणे पुढील प्रमाणे आहेत :
– खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवणे.
– खांदा जड पडणे.
– हालचाल करताना खांद्याला वेदना होणे.
– खांद्याला सूज येणे.
– झोपताना किंवा हालचाल करताना वेदना होणे.
– हाताची हालचाल करताना किंवा हात वर उचलताना खांदा दुखणे.
खांद्याच्या दुखापतीसाठी उपचार
खांद्याच्या दुखापतीसाठी घरगुती उपचार तसेच डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकतो.
खांद्याच्या दुखापतीसाठी प्रारंभिक टप्प्यावर करता येतील असे काही घरगुती उपचार पुढील प्रमाणे आहेत :
१. व्यवस्थित आराम करणे
खांद्याला दुखापत झाल्यास आराम करणे अत्यंत आवश्यक आहे. खांद्याला जास्त ताण न देणे तसेच अतिरिक्त हालचाल न करणे हे सुद्धा आवश्यक आहे.
२. आईस पॅक
खांद्याला दुखापत झालेल्या भागावर बर्फाच्या पॅकचा उपयोग करणे हा सुद्धा एक चांगला उपचार ठरू शकतो. बर्फाचा पॅक दुखापत झालेल्या भागावर लावल्यामुळे सूज कमी होण्यामध्ये मदत होते तसेच वेदना सुद्धा कमी होतात.
३. हीट थेरपी
रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी गरम पाण्याच्या पिशवीने खांद्याला दुखापत झालेल्या भागावर हलक्या हाताने शेक देऊ शकता यामुळे सूज तसेच वेदना कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते.
४. योग्य ते औषधोपचार
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार करू शकतात.
५. खांद्याचे व्यायाम
खांद्यामधील लवचिकता आणि ताकद वाढवण्यासाठी व्यायाम करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे यामुळे खांद्याचे स्नायू तणाव मुक्त होतात. खांद्याचे काही प्रभावी व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.
६. फिजिओथेरपी
फिजिओथेरपिस्ट करून योग्य उपचार घेतल्यास खांदे दुखीच्या समस्येमधून बाहेर पडण्यास नक्कीच मदत होऊ शकते.
७. चिकित्सकीय उपचार
खांद्याच्या वेदना असह्य झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा डॉक्टर योग्य ते औषधोपचार नक्कीच करतात. आवश्यक असल्यास इंजेक्शन किंवा जर दुखापत गंभीर असेल आणि इतर उपचार प्रभावी ठरत नसतील तर अशावेळी सर्जिकल उपचार करण्याचा सल्ला सुद्धा डॉक्टरांमार्फत दिला जातो.
खांद्याच्या दुखापती टाळण्यासाठी काही टिप्स
खांद्याला काही दुखापत झाल्यास नक्कीच आपली दैनंदिन जीवनशैली विस्कळीत होते अगदी छोटी छोटी कामे करणे सुद्धा कठीण होऊन जाते, म्हणूनच असे होऊ न देण्यासाठी काही टिप्स पुढील प्रमाणे आहेत :
– व्यायाम आणि स्ट्रेचिंग नियमित करू शकता, व्यायाम आणि स्ट्रेचिंग करताना योग्य पद्धत वापरणे खूप महत्त्वाचे आहे.
– खांद्यावर जास्त प्रमाणामध्ये वजन पडू न देणे याची नेहमी काळजी घ्यावी.
– तसेच चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे सुद्धा टाळा, जर चुकीच्या पद्धतीने वजन उचलले गेले तर अशावेळी खांद्याला सुद्धा दुखापत होऊ शकते.
– शारीरिक अडथळे टाळण्यासाठी योग्य पद्धतीने बसणे, उभे राहणे हे सुद्धा आवश्यक आहे.
– वजन नियंत्रणामध्ये ठेवावे , योग्य आहार घ्यावा आणि शरीरासाठी आवश्यक तितके पाणी नक्की प्यावे. वजन नियंत्रणामध्ये नसेल तर उच्च रक्तदाब, रक्तामधील साखरेची पातळी वाढणे यांसारख्या विविध समस्या जाणवू शकता. या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर नक्कीच खांद्याच्या वेदना कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते.
खांद्याची दुखापत ही सामान्य जरी असली तरी त्यासाठी वेळेमध्ये उपचार घेऊन त्यावर नियंत्रण नक्कीच मिळवता येऊ शकते. प्रारंभिक उपचारांमध्ये आराम करणे, आईस पॅक लावणे, गरम पाण्याच्या पिशवीचा शेक देणे अशा काही घरगुती उपचार पद्धती कामी येऊ शकतात परंतु दुखणे गंभीर असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर नक्कीच योग्य ते औषधोपचार करतात तसेच फिजिओथेरपी देऊ शकतात, जर खांद्याची दुखापत जास्तच गंभीर असेल तर अशावेळी सर्जिकल उपचारांचा सुद्धा निर्णय डॉक्टरांमार्फत घेतला जाऊ शकतो. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरून न जाता सकारात्मक विचारांनी योग्य ते उपचार केल्यास नक्कीच त्या परिस्थितीमधून बाहेर येता येते.