प्रोलोथेरपी (Prolotherapy) ही एक थेरपी आहे जी मानवी शरीरातील विविध ठिकाणी होणार्या वेदनांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. प्रोलोथेरपी ही थेरपी तीव्र वेदनांवर एक रामबाण उपाय मानली जाते. हा एक सुरक्षित उपचार आहे जो इंजेक्शनद्वारे दिला जातो. कोणतीही शस्त्रक्रिया न करता ही एक कायमस्वरूपी वेदना मुक्त, सुरक्षित थेरपी (Therapy)आहे.

प्रोलोथेरपी म्हणजे काय ? (What is Prolotherapy?)

‘प्रोलोथेरपीस रीजनरेटिव्ह इंजेक्शन थेरपी’ (RIT) देखील म्हणतात. ही एक लोकप्रिय विना शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक (Orthopedic) उपचार पद्धती आहे.जी शरीरात नैसर्गिक पद्धतीने पुनरुत्पादन करण्यास उत्तेजन देते. या थेरपीमध्ये सांध्यांवर उपचार होतात. ज्या भागातील सांधे खूप वेदनादायी आहेत तिथे प्रभावीपणे इंजेक्शन द्वारे पेशींची वाढ होण्यास मदत होते. इंजेक्शनमध्ये डेक्सट्रोज(Dextrose), मॉर्रुएट सोडियम(Morruet sodium), फिनॉल(Phenol), ग्लिसरीन(Glycerin), सरॅपिन (Sarapin), मॅग्नाशियम सल्फेट(Magnesium Sulphate), जस्त, ओझोन(Ozone),ऑर्थोबोलॉजिक्स(Orthobiology) इ. द्रव्यांचा वापर होतो.त्यामुळे इथे होणार्या वेदनांपासून मुक्ती मिळते.

प्रोलोथेरपी वेदनादायी आहे का? (Is Prolotherapy Painful?)

प्रोलोथेरपी इंजेक्शन दिले जाते. इंजेक्शन्समुळे होणारी वेदना तात्पुरती असते. सौम्य, नियंत्रित सूज तयार होते. जर गरज असेल तर सिटामिनोफेन (Acetaminophen) किंवा क्वचित प्रसंगी, ओपिओइड औषधांनी उपचार केले जातात. यामुळे कसलेही दुष्परिणाम होत नाहीत. ही थेरपी ८०-१०० टक्के प्रभावी ठरते.

प्रोलोथेरपी कोणत्या दुखण्यावर प्रभावी ठरते? (On which types of pain prolotherapy is effective?)

मान दुखी, सरवैकल स्पॉन्डिलायसिस, ट्रॅपेजायटीस, स्पाइनल कॅनाल स्टेनोसिस, व्हिप्लॅश दुखापत, फेसेट आर्थ्रोपॅथी इ.

गुडघादुखी, गुडघा ऑस्टियोआर्थराइटिस, फाटलेली मेनिस्कस, लिगामेंट दुखापत इ.

खांदा दुखी, गोठलेले खांदा, रोटेटर कफ दुखापत, इम्पींजमेंट सिंड्रोम, खांदा संधिवात इ.

डोकेदुखी, मायग्रेन, चेहराच्या वेदना, ट्रायजेमिनल न्यूरल्जिया, टेंपोरो मॅन्डिब्युलर (टीएम) सांधेदुखी, व्हर्टीगो इ.

बोटे दुखी, संधिवात, ट्रिगर फिंगर, डीकव्हॅनस टेनोसिनोव्हायटीस , इ.

घोटा दुखणे, टाचात वेदना होणे, पाय दुखणे, सपाट पाय इ.

प्रोलोथेरपीचे विविध प्रकार (Types of Prolotherapy)

प्रोलोथेरपी उपचार सत्रे सहसा दर दोन ते सहा आठवड्यांनी 3 ते 6 किंवा त्याहून अधिक इंजेक्शनच्या मालिकेत दिली जातात. बर्‍याच रुग्णांना काही महिन्यांत आराम मिळतो. त्यानुसार त्याची मात्रा दिली जाते. यात खालील पद्धती आहेत.

डेक्सट्रोस प्रोलोथेरपी – ही पारंपारिक थेरपी, डेक्सट्रोज व इतर नैसर्गिक संयुगांस दिली जाते.

प्रोलोझोन – प्रोलोझोन इंजेक्शनमध्ये ओझोन आणि निरनिराळे पोषक द्रव्ये असतात. ही थेरपी इन्फ्लंमेशनला ट्रिगर केल्याशिवाय पुनरुत्पादनाला उत्तेजन देते. त्यामुळे सूज येते त्यासाठी अँटी इन्फ्लामेटरी (पैन किलर) गोळी दिली जाते.

न्यूरल प्रोलोथेरपी – यामध्ये छोटी छोटी इंजेक्शन्स दिली जातात, त्यामुळे मज्जातंतूंमध्ये पुनरुत्पादनाला मदत होते.

पी आर पी प्रोलोथेरपी (PRP Prolotherapy) – यामध्ये प्लेटलेट रिच प्लाझ्मा (स्वतःच्या रक्तापासून तयार केलेले पुनरुत्पादक घटक) वापरतात.

बायोसैलुलर (Biocellular) प्रोलोथेरपी – यामध्ये BMAC हाडं/फॅट पासून तयार किंवा NANOFAT/MFAT वापरतात.

प्रोलोथेरपी ही अतिशय सुरक्षित , प्रभावी आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेली उपचार पद्धती आहे. यात रुग्णाला लवकर आराम मिळतो .विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींना ही एक प्रभावी उपचार पद्धती मानली जाते. किफायतशीर आणि वैज्ञानिक दृष्ट्या प्रमाणित असल्याने अनेक डॉक्टर ही करण्यास सांगतात.

डॉ. विक्रम राजगुरू हे भारतातील पहिल्या इंटरव्हेंशनल रीजनरेटिव्ह ऑर्थोपेडिक आणि ऑर्थो बायोलोजिक सर्जन पैकी एक आहेत. HHPF (Affiliated to Wisconsin University, Madison, (USA) जी प्रोलोथेरपीची संस्थापक संस्था आहे. तिथून प्रोलोथेरपीचे प्रशिक्षण घेणारे ते पहिले भारतीय आहेत. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच रुग्णांना वेदना निवारण देऊन आणि नॉन सर्जिकल तसेच सर्जिकल उपचारांद्वारे गमावलेली गतिशीलता पुन्हा मिळवून सक्रिय जीवनशैली मिळविण्यास मदत केली आहे.