मणके हे आपल्या शरीराचे अत्यंत महत्त्वाचे असे अवयव आहेत. काही लोकांना वेगवेगळ्या कारणास्तव मणक्याचे आजार होऊ शकतात. मणक्याच्या आजारामुळे विविध भागांमध्ये वेदना होऊ शकतात. मणक्याचे आजार होण्याचे वेगवेगळे कारणे असू शकतात, आज आपण मणक्याचे आजार होण्याची कारणे कोणती आहेत हे जाणून घेणार आहोत.

मणक्याचे आजार होण्याची कारणे

१. मणक्याचे वयासंबंधी बदल

जसजसे वय वाढू लागते किंवा वृद्धत्व येऊ लागते तेव्हा मणक्याच्या समस्या जाणवू शकतात. मणक्याच्या हाडांमध्ये, डिस्कमध्ये तसेच इतर अवयवांमध्ये नैसर्गिक बदल होत राहतात, चाळीशी नंतर हाडांची ताकद ही कमी होऊ लागते यामुळे मणक्यामध्ये वेदना होणे, तसेच मणक्याच्या इतर समस्या होऊ शकतात. 

२. सतत चुकीची स्थिती असणे 

वेगवेगळी कामे करत असताना जसे की वाचन करताना, मोबाईल वापरताना, कम्प्युटरवर काम करताना, जास्त वेळ खुर्चीवर बसताना चुकीची स्थिती असेल तर हे मणक्याच्या वेदना होण्याचे कारण असू शकते. अशा चुकीच्या स्थितीमुळे मणक्याच्या हाडांमध्ये तसेच स्नायुंमध्ये ताण निर्माण होतो आणि यामुळे मणक्याच्या वेतना तसेच समस्या जाणवू शकतात.

३. व्यायामाची कमतरता

दैनंदिन आयुष्यामध्ये व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. जेवढा व्यायाम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे तितका व्यायाम केलाच पाहिजे. आपल्या शरीराला व्यवस्थितपणे व्यायाम मिळाल्यास आपल्या शरीराचे अवयव तसेच मणक्याचे स्नायू व्यवस्थित राहतात किंबहुना अधिक चांगले बनतात. जर व्यायामाची कमतरता असेल तर मणक्याचे स्नायू कमजोर होऊ शकतात आणि मणक्याच्या समस्या जाणवू शकतात. 

४. जास्त वजन असणे

जर व्यक्तीचे वजन अत्याधिक असेल तर अशावेळी मणक्यावर अतिरिक्त ताण पडतो आणि यामुळे मणक्यामध्ये वेदना जाणवू शकतात. 

५. काही दुखापत झालेली असल्यास

काही अपघात झालेला असेल उदाहरणार्थ पाय घसरल्यामुळे पडणे, अपघात होणे, पाठीवर जास्त वजन पडणे या कारणामुळे सुद्धा मणक्यामध्ये वेदना जाणवून मणक्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

६. अनुवंशिकता

मणक्याच्या काही आजारांचा जेनेटिक फॅक्टरशी संबंध असतो त्यामुळे मणक्याच्या काही समस्यांना जेनेटिक फॅक्टर्स नक्कीच कारणीभूत असतात. ऑस्टिओआर्थ्राराइटिस , स्कोलिओसिस यांसारखे काही मणक्याचे आजार अनुवंशिक कारणांमुळे/जेनेटिक फॅक्टर्स मुळे होऊ शकतात. 

७. स्मोकिंग करणे

मणक्याच्या समस्या मागे स्मोकिंग हे सुद्धा कारण असू शकते. स्मोकिंग केल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो आणि यामुळे हाडे तसेच मणक्याच्या स्नायूंना आवश्यक ते पोषण मिळत नाही परिणामी मणक्याचे आजार होण्याची संभावना वाढते.

८. ऑस्टिओआर्थ्राराइटिस

ऑस्टिओआर्थ्राराइटिस हा आर्थ्राराइटिसचा प्रकार असून मणक्याच्या जोडांमध्ये उद्भवतो, यामुळे हाडांमध्ये सूज येते आणि वेदना निर्माण होतात. या कारणास्तव मणक्याचे कार्य कमी होऊ शकते.ऑस्टिओआर्थ्राराइटिस या आजारामुळे हाडांवर अधिक ताण पडू शकतो आणि हाडांची कचरण होऊ शकते परिणामी मणक्याचे आजार वाढू शकतात 

९. मानसिक आणि शारीरिक ताण

काही केसेस मध्ये मानसिक आणि शारीरिक ताण-तणावामुळे सुद्धा शरीरावर दबाव निर्माण होतो आणि याचा परिणाम मणक्याच्या स्नायूंवर होतो. मणक्याचे स्नायू ताणले जातात त्यामुळे वेदना निर्माण होतात परिणामी मणक्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

१०. लहान वयामधील समस्या

काही केसेसमध्ये अगदी लहान वयामध्ये सुद्धा मणक्याचे विकार होऊ शकतात. स्कोलिओसिस सारखे आजार लहान मुलांमध्ये दिसून येतात याचे कारण अनुवंशिक असते आणि हे समस्या जन्मा होण्याच्या आधीपासून सुद्धा असू शकते. 

११. चुकीची जीवन पद्धती

योग्य आहार न घेणे, व्यायाम न करणे, शरीरासाठी आवश्यक ते पुरेसे पाणी न पिणे, पुरेशी झोप न घेणे यांसारख्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा शारीरिक समस्या त्यामध्ये मणक्याच्या समस्या सुद्धा जाणवू शकतात. 

१२. संक्रमण

काही केसेस मध्ये काही संसर्ग मणक्याच्या भागाला प्रभावित करू शकतो आणि परिणामी मणक्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

१३. ट्यूमर असणे

मणक्यामध्ये कोणतेही प्रकारचे ट्यूमर असेल तर अशावेळी सुद्धा मणक्यामध्ये वेदना होऊ शकतात मग हे ट्यूमर सौम्य किंवा घातक सुद्धा असू शकतात. 

१४. चुकीच्या वाहनाने किंवा जास्त वेळ प्रवास करणे

काही व्यक्ती लांब अंतरावर सुद्धा दुचाकीने प्रवास करतात जर अशावेळी रस्ता चांगला नसेल किंवा जास्त लांबचा प्रवास झाला आणि हे असे दीर्घकाळ होत असेल तर अशावेळी त्या व्यक्तीला मणक्याच्या समस्या जाणवू शकतात. 

१५. अत्याधिक परिश्रमाचे काम असणे

ज्या व्यक्तींना जास्त परिश्रमाचे काम असते उदाहरणार्थ, जड वस्तू उचलणे तर अशावेळी या व्यक्तींना सुद्धा मणक्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता असते.      अशाप्रकारे मणक्याच्या समस्या उद्भवण्याचे विविध कारणे असू शकतात. आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून, तसेच नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊन या समस्या पासून सुटका मिळवू शकतो. दैनंदिन जीवनशैलीमध्ये नियमित योग आणि व्यायाम करणे सुद्धा खूप आवश्यक आहे. अशाप्रकारे काही चांगले बदल आपल्या जीवनशैलीमध्ये केल्यामुळे बऱ्याच शारीरिक समस्या तसेच मानसिक समस्या यांपासून आपण दूर राहू शकतो. जर तुम्हाला सुद्धा मणक्या संबंधी कुठलीही समस्या असेल तर द प्रोलोथेरपी क्लिनिक येथे संपर्क करा.

To Book An Appointment Contact us on given number – 7507501241, 7507503736, 9049046867