आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, जिथे अधिकतर कामकाज ऑनलाइन किंवा डेस्कवरील असते, तिथे सतत बसण्यामुळे पाठदुखी ही समस्या जाणवू शकते. पाठदुखी ही समस्या गंभीर समस्या होऊ शकते त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.आजच्या या ब्लॉगमध्ये आपण सतत बसल्यामुळे होणाऱ्या पाठ दुखीची काही कारणे आणि खबरदारी घेण्याचे काही उपाय बघूयात…

सतत बसण्यामुळे होणाऱ्या पाठ दुखीची कारणे :

सतत खुर्चीवर बसून काम केल्यामुळे पाठ दुखीची समस्या जाणवू शकते, सतत बसलमुळे होणाऱ्या पाठदूखीच्या समस्या मागे असणारी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत : 

1. अयोग्य पद्धतीने कामासाठी बसणे: 

– कम्प्युटरवर काम करत असताना किंवा टेबलवर काही काम करत असताना ज्यावेळी खुर्चीवर आपण बसलेलो असतो त्यावेळी काही व्यक्तींची बसण्याची पद्धत अयोग्य असते.

 – चुकीच्या बसण्याच्या पद्धतीमुळे मणक्यांवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे पाठ दुखी जाणवू शकते.

– म्हणूनच योग्य खुर्चीचा वापर आणि योग्य आसन महत्त्वाचे आहे.

2. सक्रियतेचा अभाव असणे : 

– बऱ्याचदा खुर्चीवर बसून काम करत असताना दीर्घकाळ एकाच जागेवर बसले जाते आणि त्यामुळे इतर काही ऍक्टिव्हिटी होत नाही आणि यामुळे सुद्धा पाठ दुखीचा त्रास जाणवू शकतो.

– म्हणूनच चालणे, वॉकिंग ब्रेक्स घेणे महत्त्वाचे आहे यांमुळे स्नायू सक्रिय राहतात. सतत बसणे हाडे आणि स्नायूंमध्ये कमजोरी निर्माण करू शकतात.

3. कंप्युटर स्क्रीनची उंची :

– आपण ज्या कंप्यूटरवर काम करत आहोत त्या कम्प्युटरची उंची तसेच डेस्कची उंची योग्य असणे आवश्यक आहे.

– स्क्रीनची उंची योग्य नसल्यास, मानेवर आणि पाठीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

4.  दीर्घ काळ खुर्चीवर बसणे :

– कामानिमित्त बराच वेळ एकाच ठिकाणी खुर्चीवर बसावे लागते आणि हे सुद्धा पाठ दुखी चे कारण होऊ शकते.

– दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसल्याने रक्ताभिसरण कमी होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये ताण येतो आणि पाठदुखीची समस्या जाणवू शकते.

 सतत बसल्यामुळे होणारी पाठ दुखी न होण्यासाठी खबरदारीचे उपाय –

दीर्घकाळ खुर्चीवर बसून किंवा एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे पाठदुखी न होण्यासाठी कोणती खबरदारी बाळगावी, त्यासाठी काही उपाय पुढील प्रमाणे आहेत :

1. योग्य पद्धतीने कामासाठी खुर्चीवर बसणे: 

– खुर्चीवर बसून काम करत असताना नकळत आपण अयोग्य आसनामध्ये बसतो आणि त्यामुळे पाठ दुखीची समस्या जाणवते. 

– म्हणूनच काम करत असताना खुर्चीवर योग्य पद्धतीने बसणे आवश्यक आहे यासाठी खुर्ची चांगली असावी आणि पाठीला आधार देणारी असावी.

2. सक्रियतेत वाढ करणे आवश्यक:

– बऱ्याचदा खुर्चीवर बसून काम करत असताना आपण एवढे व्यस्त असतो किंवा इतर काही कारणास्तव आपण एकाच ठिकाणी बसून सतत काम करत असतो आणि त्या दरम्यान आपण थोडी सुद्धा हालचाल करत नाही यामुळे पाठदुखीची समस्या जाणवू शकते.

– दर 30 ते 45 मिनिटांनी उभे राहणे आणि थोडा वेळ चालणे आवश्यक आहे. 

– चालणे, स्ट्रेचिंग किंवा इतर काही छोटे व्यायाम करणे आवश्यक आहे.

3. डेस्क सेटअप व्यवस्थित असावा :

– ज्या डेस्क वर आपण काम करत आहोत त्याची उंची आणि इतर सर्व सेटअप व्यवस्थित असणे आवश्यक आहे, जर हा सेटअप अयोग्य असेल तर आपल्या मानेला त्रास होतो आणि परिणामी पाठदुखी सुद्धा जाणवू शकते.

– स्क्रीन उंची समतोल ठेवावी आणि मानेची स्थिती योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असेल त्याप्रमाणे सेटअप करावा.

4. व्यायाम करावा:

– आपल्या संपूर्ण शरीरासाठीच व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे दररोज व्यायाम किंवा योगा अवश्य करावा.

– ज्या व्यक्ती सतत बसून काम करत असतात त्यांनी नियमित व्यायाम, विशेषतः पाठीच्या स्नायूंचा आणि पोटाच्या स्नायूंचा व्यायाम करावा जेणेकरून पाठ दुखीची समस्या किंवा इतर समस्या जाणवणार नाही 

5. सपोर्टिव्ह उपकरणे वापरावीत :

– हल्ली मार्केटमध्ये काही सपोर्टिंग उपकरणे उपलब्ध आहेत यांचा उपयोग करून आपण पाठदुखीची समस्या जाणवण्यापासून वाचू शकतो.

– काही सपोर्टिव उपकरणे जसे की लोअर बॅक सपोर्ट पिलो किंवा स्टँडिंग डेस्क यांचा वापर करू शकता आणि पाठ दुखीच्या समस्या पासून आपले संरक्षण करू शकता. पाठदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी सुद्धा त्रासदायक समस्या पण आहे, ज्यावर योग्य काळजी आणि योग्य त्या बदलांनी मात केली जाऊ शकते. नियमित व्यायाम, योग्य आसन आणि चांगली जीवनशैली स्वीकारल्याने आपली पाठ अधिक निरोगी राहू शकते. आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सुद्धा पाठ दुखी किंवा पाठीसंबंधी काही समस्या असतील तर लवकरच द प्रोलोथेरपी क्लिनिक, पुणे येथे संपर्क साधा.

Contact No. Hadapsar – +91 7507501241 / Pimple Saudagar – +91 9049046867 / Kharadi – +91 7507503736